ब्लॉगिंग मध्ये करिअर आणि यश मिळवण्यासाठी खालील विषयावर तुम्ही ब्लॉक लिहू शकता.



ब्लॉगिंग मध्ये करिअर आणि यश मिळवण्यासाठी खालील विषयावर तुम्ही ब्लॉक लिहू शकता.


एका विशिष्ट उद्देशाने ब्लॉगिंग केल्याने आपले नाव समाजामध्ये ब्लॉगर लिस्ट



मध्ये आणि चांगला नफा मिळवू शकता.


ब्लॉग लिहिताना तुम्ही कोणत्याही विषयावर ब्लॉक लिहू शकता. सामान्यतः लोक कोणत्या विषयावर सर्च करतील हा आपल्या डोक्यात नेहमी येणारा विषय आहे परंतु आपल्याला जे प्रश्न पडतात तेच प्रश्न सर्वसामान्यता सर्वांनाच पडत असतात. काही विशिष्ट वर्षांपूर्वी आपण विचारही केला नसेल की प्रत्येक जण आपले प्रश्न सोडवण्यासाठी इंटरनेटचा वापर करेल.

याविषयी काही महत्त्वाचे विषय आपण पाहणार आहोत.

1) ट्रॅव्हलिंग ब्लॉग



              ट्रॅव्हलिंग हा एक छंद असून हे प्रत्येकालाच आवडते. आपण वीकेंडला कुठे फिरायला जायचं याचा प्लॅन करत असताना पहिल्यांदा आपल्या डोक्यात येतो तो विषय म्हणजे इंटरनेटवरून आपण माहिती शोधून आपला विकेंड प्लॅन करत असतो. आपण शोधण्याचे विषयी जसे की हॉटेल्स जिथे आपल्याला राहता येईल कोणत्या हॉटेलमध्ये जेवण चांगलं मिळतं फिरण्याची महत्त्वाची ठिकाणे या सोबतच आपल्याला सिक्युरिटी हवी असते त्याचा देखील आपण सोबत विचार करत असतो जीवनशैली सह संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करतो तुमच्या ट्रॅव्हलिंग स्टोरीज टिप्स ट्रॅव्हलिंग करताना घ्यावयाच्या काळजी इत्यादी विषयी तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकता.


2) parenting blog

             सर्वसाधारणपणे सर्वांच्या आयुष्यात येणारा हा विषय आहे कारण पेरेंट्स बनलेल्या लोकांसाठी अतिशय उपयोगाचा विषय आहे. हा कसा तर लहान मुलांच्या आहाराबद्दल सर्वप्रथम पेरेंट्सच्या डोक्यामध्ये येणारा विषय त्यानंतर ते हळूहळू चालायला लागतात त्यांचे कपडे मुलांचे राहणीमान त्यांचे शिक्षण वयात येताना त्यांना करावयाचे मार्गदर्शन इत्यादी संदर्भात प्रत्येक विषयावर तुम्ही ब्लॉग लिहू शकता खरोखरच जन्यन असे लोक अशा विषयावरती इंटरनेटवर सर्च करतात आणि तुमचा ब्लॉग आवडीने वाचून त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे ते त्यांच्या आयुष्यामध्ये मुलांना वाढवण्यासाठी वापरतात.


3) फॅशन ब्लॉग

             विशेषता महिलांचा जिवाभावाचा विषय आहे परंतु आज पुरुषांना देखील हवाहवासा वाटणारा विषय झाला आहे. यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक व्यक्ती सर्वसाधारण लोकांच्या मध्ये उठून दिसण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी तो वेगवेगळ्या कपड्यांसाठी नखे केस उठण्या बसण्याची पद्धत वापरणारे ज्वेलरीज या सर्वांवर विशेषतः लक्ष देतो आणि आपल्या कमायेतील पैसा देखील खर्च करत असतो. कपड्यांच्या फॅशन आणि कलर कॉम्बिनेशन विषयी जागरूक असतो. यासाठी कितीही खर्च झाला तरी मागेपुढे न विचार करता काम करत असतात.

4) हेल्थ आणि फिटनेस ब्लॉग

               अशा प्रकारच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आरोग्याची संबंधित आणि व्यायामाची संबंधित ब्लॉक लिहून सर्वसाधारण लोकांना जागृत करू शकता त्यासाठी तुम्ही वेगवेगळे टिप्स देऊ शकता आणि लोक सर्वाधिक इंटरनेट वरती अवलंबून असतात. यामध्ये आपण आहारापासून व्यायामापर्यंत कोणते पदार्थ खावेत कोणते व्यायाम करावेत कोणत्या वयामध्ये कोणते व्यायाम केले जातात कोणत्या वयामध्ये कोणते आहार शरीराला योग्य ठरतात पोषक आहार कोणकोणत्या आहेत व्यायामाचे प्रकार कोणकोणते आहेत या सर्वसाधारण गोष्टींविषयी तुम्ही ब्लॉग लिहू शकता.

5) Pet blog

           या आधुनिक जमान्यांमध्ये पाळीव प्राण्याबद्दल खास माहिती जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांमध्ये दिसून येते प्राण्यांचे आरोग्य स्वच्छता त्यांचे खाणे त्यांना बाहेर फिरवणे मेडिकल चक्कर याविषयी गोष्टींचा समावेश होतो प्राण्यांवर असणारे प्रेम आणि आपुलकी याविषयी तुम्ही ब्लॉगमध्ये लिहू शकता आणि लोकांना जागृत करू शकता.

Comments

Popular posts from this blog

3 आगामी नवीन रॉयल एनफील्ड 650cc बाईक.

रक्तातील साखर आणि झोप यांच्यातील संबंध.